हिंदीवर बहिष्कारच टाकावा असे मला सुचवायचे नाही. आवड असेल त्यांना हिंदी शिकण्याचा पर्याय जरूर असावा, पण त्याबरोबरच जर्मन, स्पॅनिश किंवा आपल्या बंगाली, तमिळ यासारखा भाषा बरोबरीने उपलब्ध असाव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान अधिक विस्तारण्यास मदत होईल असे वाटते.

रवी,

आपला हा वरील विचार मला खूप आवडला. कारण असे होण्याने भारतावर असलेले 'उत्तर भारतीय मानसिकतेचे' वर्चस्व काहीसे कमी करता येईल. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच बंगाली, असामी, मल्याळी वा तमिळ इत्यादी भाषेतील साहित्याशी परिचय करून घेता येईल. असे होण्याने आपल्याच देशातील वेगवेगळ्या प्रांतातील विचारधारेशी, संस्कृतीशी, मानसिकतेशी थोडा तरी परिचय होईल. तसेच दुसऱ्या प्रांतातील लोकांचे विचार, त्यांची सुख:-दु:खे जाणल्याने भारतातील जनतेमध्ये आपल्याच प्रांताबाबत एककल्ली विचार करणं ही थांबवता येईल.

सध्या अल्पशिक्षित असो वा अशिक्षित, हिंदी भाषक लोकांमध्ये एक मुजोरपणा व सगळा देश आपलाच आहे (कारण कानून ऐसा कहता है) ही जी मनोवृत्ती वाढते आहे त्याला आळा घालता येईल. त्यासोबत जो समाज सुशिक्षित, विचारवंत आहे, ज्याचे साहित्य अगदी उच्चदर्जाचे आहे त्यांचे विचार ह्या देशावर राज्य करू शकतील. सध्या तरी जो समाज जास्तीत जास्त मुलं जन्माला घालून आपली लोकसंख्या वाढवेल, व स्थानांतर करून मतदार संघ वाढवेल त्यांचंच वर्चस्व होऊ पाहते आहे.