सावरकरांनी(१९२७) लिपीत फक्त दोन सुधारणा सुचवल्या. (१) इ, ई, ए आणि ऐ ही अक्षरे 'अ'ला वेलांटी/मात्रादेऊन लिहावीत आणि (२)'ऱ्य'मधला जो 'र'चा अर्धा भाग आहे त्याला काना देऊन पूर्ण 'र' लिहावा. अशाच प्रकारे ल, क आणि फ ही अक्षरे काना देऊन लिहावीत. क्ष हे अक्षर क्ष असे लिहावे.
हे मनोगतावर लिहून पाहता येईल. मनोगतावर .j (डॉट जे) चा वापर करून हे साधता येते.
अि अी ... साठी अनुक्रमे a.ji a.jee ... असे वापरावे (स्वयंसुधारणा बंद ठेवावी म्हणजे ऱ्हस्वाचे दीर्घ न होता पाहता येईल)
ऱ्ा साठी R.jaa ल्ा साठी l.jaa क्ा साठी k.jaa असे वापरून पाहता येईल.
टीप. : इथे लिहून प्रत काढून अशी अक्षरे दुसरीकडे चिकटवता येतील; पण मनोगतावर चिकटवताना .j .s हे काढून टाकले जाण्याची शक्यता असल्याने चिकटवता येणार नाहीत असे वाटते.