ह उहापोह फक्त शहरी वर्ग डोळ्यासमोर ठेवून चालला आहे असे वाटते ग्रामीण जनतेचे काय त्यांचा विचार यात झालाच नाही.
ही ग्रामीण मंडळी इंग्रजी कसे आणि कोठे शिकणार आणि बोलणार ? याउलट ह्या मंडळींना हिंदी भाषा जास्त जवळची वाटेल.
कारण भारतात हिंदीचा प्रसार करण्यात आपल्या सिनेमाचे मोठे योगदान आहे. हिंदी भाषा लिहायला जवळजवळ मराठिसारखीच
आहे. ती थोडी अशुद्ध बोलली तरी चालते. पण इंग्रजीचे काय तिला शिकण्यासाठी किती कष्ट घेणार शिवाय तिचा जास्त उपयोगही
नाही . याबाबतीत भारताची इतर देशांशी तुलना करणे चुकीचे आहे. कारण हे देश आकारमानाने टीचभर आहेत शिवाय त्या
देशांवर परकीय सत्ता नवती त्यामूळे त्यांची एकच भाषा टिकून राहिली पण आपले काय अगदी प्राचीन काळापासून आपल्या
देशावर परकीयांनी आक्रमण केले काही मंडळी तर इथेच स्थाइक झाली. त्यामूळे आपली राजभाषा हिंदीच असावी
असे वाटते. लोकांना सहज समजते. हिला शिकण्यासाठी जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत . फक्त हिंदीतील काही क्लिष्ट
शब्द नाहीसे केले तर ही भाषा इंग्रजीच्या तोंडात मारेल असे मला वाटते.