चर्चेचा प्रस्ताव, हा वैयक्तीक सोय महत्त्वाची की राष्ट्रिय / सामाजीक कर्तव्य? या स्वरुपाची आहे
प्रसंगी, राष्ट्रिय कर्तव्य हे वैयक्तीक सोयीपेक्षा श्रेष्ठच.
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे मान्य, आणि हिंदी शिकणे हे उपयुक्त आहे हेही समजू शकतो, पण...
...हिंदी शिकणे हे राष्ट्रीय कर्तव्य कधीपासून झाले?
मग हिंदी न शिकणे हे राष्ट्रद्रोहाशी तुलना होण्यासारखे पातक, नव्हे गुन्हा, मानून अशा व्यक्तीस तुरुंगात डांबावे आणि सक्तीने हिंदी शिकवावी काय? आणीबाणीत कुटुंबनियोजन न करणाऱ्यास डांबत आणि सक्तीने नसबंदी करत तसे?
उलटपक्षी, माझ्या मते हिंदी शिकणे हे 'राष्ट्रीय कर्तव्या'पेक्षा 'वैयक्तिक सोय' याच सदरात मोडणे सयुक्तिक वाटते.
(आणि होय, अशी धोरणे ठरवताना अधिकतरांची वैयक्तिक सोय कशी होईल ते पाहणे हेच राष्ट्रकर्तव्य, हाच लोकशाहीचा पाया होय.)