लहान बहरात किती प्रभावी लिहित येऊ शकते ह्याचे ही गझल एक अतिशय चांगले उदाहर्ण आहे.
काही किरकोळ बदल सुचवावेसे वाटतात..
सज्जनांना जलसमाधी,
आणि पापी पार झाले?!
"शांतिवार्ता सफल झाल्या"
नि अचानक वार झाले!
किंवा
हे कसे मग वार झाले?.. मतला, मक्ता दोन्ही उत्तम
पेटता वणवे तमाचे
सूर्य सारे गार झाले... वा!
पाय धरले एकदा की.. असे करावे का?
( लहान बहरात अभिव्यक्तीचा श्वास कोंडतो असे म्हटल्या जाते, पण ह्या गझलेतला आशय मुक्त श्वास घेतोय.. मतल्यात कविचा श्वास कोंडलाय तरी..! :)
-मानस६