वरच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ह्या चर्चेचा विशय वेगळा आहे. मुळात ह्या चर्चेत श्री. गांगल ह्यांनी उपस्थित राहून श्री. मिलिंद फणसे व श्री. आशिष अल्मेडा ह्यांच्या प्रश्नांना सामोरे जायला हवे. इथे माझा प्रतिसाद प्रकाशित झाल्यानंतर मला श्री. गांगल ह्यांचा इ-मेल येऊन 'फेसबुक वर नोंदणी करून मला भेटा' असे सांगण्यात आले. त्यावर मी ही त्यांना कृपया आधी मनोगत वरील ह्या चर्चेत सहभागी होवून आपली भुमिका व विचार स्पष्ट करा, त्यानंतरच आपल्यात पुढील संवाद चालू करता येईल. असे कळवले. असो!
अद्वैतुल्लाखान,
नमस्कार!
आपला प्रतिसाद वाचला त्यातून असे कळले कि आपल्याला लिपी व लिपीतील बदल ह्या विशयीची पूरेशी माहीती आहे. तेंव्हा माहीती नसल्या मुळे आपण माझ्या विचारांना कोते म्हणत नाही आहात हे मला समजले. हे इथपर चांगल झालं!
मग तरीही नेमका मतभेद कुठे आहे ते जाणण्याचा प्रयत्न करूया.
मतभेद क्र.१) मराठी लिपीत सुधारणा करायची तर संस्कृत, अर्धमागधी, पाली, नेपाळी, हिंदी, कोंकणीतही करायला पाहिजे. फक्त मराठीत सुधारणा करणे हे कोतेपणाचे लक्षण आहे.
उत्तर. : तुमचे हे विधान मला समजले नाही. गुजराती समाज गुजराती भाषेसाठी, लिपी साठी त्यांच्या गरजानुसार बदल करीत आहेत ह्यात (तुम्हाला ही काही) वावगे वाटत नाही. मग मराठी समाजाने आपल्या पुढच्या पिढीसाठी लिहीताना जलद वेग, कमीत-कमी चूका व्हाव्ह्यात ह्यासाठी विचार करणं ही कोते पणाचं कसं काय होवू शकतं? जुन्या व इतिहास कालीन संस्कृत, अर्धमागधी, पाली तसेच परप्रांतातील हिंदी, कोंकणी व परदेशातील नेपाळी ह्या भाषांचा माझ्या महाराष्ट्रातील नागरीकांशी संबंध तो काय? आपण ह्या भाषांचे व त्या भाषकांचे काही देणे लागतो काय? अर्थात ह्या भाषांचा मराठी भाषक समाजाच्या भल्याशी काय बरे संबंध येतो ते कृपया आपण विषद करावे.
मतभेद २) लिपी ही आपली संस्कृती असते, तिच्यात कोणताही मूलगामी बदल करण्याचा विचारसुद्धा मनात आणणे हा संस्कृतीद्रोह आहे.
उत्तर. : आपले हे विधान निर्सग नियमांना मानणारे , नव्हे जुमानणारे नाही असे वाटते. संस्कारांपासून संस्कृती आकारते. लिपी ही फक्त लिहीण्याची पद्धती असते. संस्कार म्हणजे समाजाने स्वतःच्या भल्यासाठी आखलेले नीती-नियम. लहान मुलांना व अशिक्षितांना लिहायला, वाचायला शिकवणे हे संस्कार! असंच लिहायचं तसंच लिहायचं किंवा असं लिहायचं नाही वा तसं लिहायचं नाही, असं सांगत लिहीण्याला व त्याचसोबत ऐकण्याला ग्रहणशक्तीला वळण लावायची कृती म्हणजे संस्कार. जेव्हा काळ बदलतो तेव्हा त्या बदलाला सामोरे जात टिकून राहण्यासाठी काही बदल 'काय करायचं व कसं करायचं' ह्या प्रक्रीयेत करावे लागतात. ह्या बदलालाचा 'उत्क्रांती' म्हणतात. हे आपण जाणता.
लिपी व लिपीचे नियम हा वेगळा विशय आहे. तेंव्हा आपण थोडं वळूया 'शुद्धलेखन' ह्या विशयाकडे. मराठी समाजात शुद्धलेखन हा 'गुड हँडरायटींग अधिक स्पेलिंग मिस्टेक रहीत लिखाण' असा काहीसा समजला जातो. ह्या समजातील घोळामूळे का आपण विरोध करता आहात का? ते कृपया कळवा!
आपाला मित्र,
सतीश रावले