हिंदी थोडी अशुद्ध बोलली तरी चालते. पण इंग्रजीचे काय? तिला शिकण्यासाठी किती कष्ट घेणार शिवाय तिचा जास्त उपयोगही नाही.

हिंदीच काय, पण कुठलीही भाषा अशुद्ध बोलली तर चालत नाही. अशुद्ध हिंदीमुळे आर आर पाटलांना जावे लागले, हे वर आलेच आहे. चांगली हिंदी भाषा शिकायला जितके कष्ट पडतात, त्यापेक्षा कितीतरी कमी कष्ट बर्‍यापैकी इंग्रजी शिकायला पडतात. आणि शिवाय, इंग्रजी शिकण्यासाठी अनेक मार्ग अगदी खेडोपाडीसुद्धा उपलब्ध आहेत. हिंदीत नपुंसकलिंग नाही, त्यामुळे हिंदी शब्दांचे लिंग मराठी लोकांना घोटाळ्यात पाडते.  नुक्तावाले क, ख, ग, ड, ढ हे उच्चार मराठी लोकांना येत नाहीत. जन'ता, उप'राष्ट्रपती, भा'वना, इं'दिरा या शब्दांचे उच्चार अनुक्रमे, जन्ता, उप्राष्ट्रपति, भाव्ना अणि इंद्रा करायचे हे मुद्दाम शिकावे लागते. योग्य उच्चार न केले तर ते फार विचित्र वाटते. इंग्रजी उच्चार शिकण्यासाठी शब्दकोश असतात, आणि ते उच्चार स्पेलिंगवरून सवईने आपोआप समजतात. इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगही सहसा पाठ करावे लागत नाही, ते काय असावे याचा तर्क उच्चारावरून सहज करता येतो. याउलट, हिंदी/मराठी उच्चार शिकायला त्या त्या भाषेतले शब्द अनेकदा ऐकावे लागतात. चांगले उच्चार ऐकायला मिळाले तरच बहुधा र्‍हस्व-दीर्घ योग्य रीतीने लिहिता येतात. शब्दकोशांत उच्चार द्यावयाची पद्धत नाही.

शिवाय त्या देशांवर परकीय सत्ता नवती त्यामूळे त्यांची एकच भाषा टिकून राहिली

जगातील प्रत्येक देशावर कधी ना कधी परकीय सत्ता होती. असे नसते तर, युरोपातील प्रत्येक भाषेत इतर भाषांतले शब्द आलेच नसते.  आशिया आणि आफ़्रिकेतले देश तर सतत परकीय जोखडाखाली होते. मुळातून अस्तित्वात नसलेला इस्राईलसारखा देश जर अस्तंगत झालेली आपली भाषा लाखभर शब्दांची भर घालून पुनर्जीवित करू शकतो, तर आपल्याला काय अशक्य आहे?