हे विधान सरसकट मराठी लोकांना लागू होत नाही. अपवादाने मराठी माणसाचे हिंदी चांगले असेलही ( तसे मराठी माणसाचे मराठीही अपवादानेच चांगले असते! ) पण एकंदर महाराष्ट्रात हिंदीच्या नावाने आनंदच आहे.
हे तंतोतंत पटले. दुसर्याला मराठी शिकवण्याच्या फंदात पडण्यापेक्षा त्याची भाषा शिकून घ्या! आणि त्याच्याशी त्याच्यात भाषेत बोला. जेव्हा आपल्यांत असलेला मराठीचा अनिष्ट दुरभिमान नष्ट होईल तेव्हाच आपली प्रगती होईल, आणि मराठीइतक्याच इतरही भाषा आपल्याला समजू लागतील. तसे घडले तर, दुसर्याशी त्याला न समजणार्या मराठी भाषेतून बोलायची पाळी येणार नाही.