भानस यांच्या समजुतीप्रमाणे मराठी माणसाचे हिंदी कदाचित चांगले(!) असेल, पण त्याचे मराठी चांगले नसते हे नक्की. दूरदर्शनवरील शंभर टक्के जहिरातींमधले मराठी अशुद्ध असते. ह्या जाहिराती मराठी माणसांनीच केलेल्या असतात ना? पडद्याच्या तळाशी उमटणार्‍या चलपट्ट्यांतील मराठी ९० टक्के चुकीचे असते. निवेदक जन्ता, पारंपारिक, भार्ताने असले भयानक उच्चार करतात. सारेगमप किंवा असल्या तमाम कार्यक्रमांतून इंग्रजी शब्दांचा वापर केल्याशिवाय(मुग्धा वैशंपायनचा व हृदयनाथ मंगेशकरांचा अपवाद वगळल्यास) एकालाही मराठी बोलता येत नाही.