भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी च्या टेक्नोलॉजी फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडियन लँगवेजेस च्या संकेतस्थळावर राष्ट्रभाषा हिंदीकरता शासनाने विकसित केलेला तंत्रविषयक शब्दकोष 'शब्दिका' सर्वांनी बघावा. बव्हंशी शब्द मराठीतही जसेच्या तसे वापरावेत ह्या मताचा मी आहे. तो शब्दकोष करण्यात अर्वाचिन साधनांचा पुष्कळ वापर झाला आहे. आपण त्यांचा लाभ घ्यावा.