माझ्या या गझलेत 'गझलियत' नाही असे सरळ म्हणा हवे तर!

हो! नाही आहे गझलियत!

पण 'गझलियत' चा संबध हा गझलचा विषय किंवा आशय हा सामाजिक, शृंगारिक वा आध्यात्मिक असण्याशी कसा काय निगडीत आहे?

गझल हा काव्यप्रकार मुळातच काही रंग घेऊन आला आहे. त्यात प्रेम, विरह, अनुभुती ( म्हणजे अनुभव नाही ), व्यथा, विश्वाच्या अतर्क्यतेशी जवळीक या गोष्टी असायच्या अन असतात. आज 'जदीद' वगैरे नावाने ओळखले जाणारे काव्यप्रकार हे 'गझलतंत्रात' असले तरीही त्या गझला नाहीत. ( असे मला वाटते असे आपण म्हणू शकता. पण, गझल हा काव्यप्रकार मुळात वर दिलेल्या भावना / गोष्टी अधोरेखीत करण्यासाठीच आहे. )

"'मराठी' भाषेत आम्ही गझल कशीही करू" या विधानाला काहीही अर्थ नाही. ती गझल नसते. गझलेला स्वतःचा असा एक गुण आहे.

आपले विधान हे एक 'स्वीपिंग स्टेटमेंट' /(सर्वसमावेशक) आहे. मी या गझलेत एखादा भावुक/प्रेमभावनेचा शेर लिहला असता तर आपल्यामते मग गझलियत आपोआप आली असती काय?

मुळीच नाही. प्रामुख्याने त्यात जर आपले स्वतःचे आयुष्य दिसून आले असते तर 'गझलियत' येण्यास वाव होता. फक्त राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती सांगत बसणे हे बिचाऱ्या गझलेचे काम नाही.


आपली स्वतःची काही वैयक्तिक मते, ग्रह आहेत. (उदा. मी मुक्तछंद मानीत नाही. फिनिक्सच्या 'थकवा'हा कवितेला आपण दिलेला प्रतिसाद) तुम्ही मुक्तछंद मानीत नाही असे म्हटल्यावर मुक्तछंदावरची तुमची समीक्षा ही नकारात्मकच असणार यात नवल काय?

मुक्तछंद - यात कसेही काहीही लिहिता येते. मग पद्य अन गद्य यात फरक काय? तीच कविता (? ) 'गद्य साहित्य' म्हणून प्रकाशित करायला फार तर काही 'कर्ता कर्म क्रियापद' यांचे छोटेखानी नियम पाळावे लागतील. मी समीक्षा करतही नाही अन समीक्षा आवश्यकही मानत नाही. मी एक वाचक आहे अन मला 'आवडले' किंवा 'आवडले नाही' म्हणण्याचा अधिकार असावा.

वैयक्तिक मते, ग्रह बाजूला ठेवून आस्वाद घेतला पाहिजे तरच तो खरा.

वैयक्तिक मते सांगायची नाहीत तर काय सांगायचे? मी दुसऱ्याची किंवा मला न पटणारी मते सांगायला इथे येत नाही.

अन्यथा, प्रतिसाद किंवा समीक्षा ही पूर्वग्रहदूषित नसल्याची उणीव जाणवणे सहज शक्य होते.

शक्य आहे. तशी उणीव जाणवणे! तसेच, प्रतिसादास पुर्वग्रहदुषित मानणे हेही पुर्वग्रहदुषित असू शकते.

या अशाच निकषावर आपण अनेकदा गझलांची टोकाची समीक्षा करता असे आतापर्यंतच्या अनेक प्रतिसादातून सहज लक्षात येते.

मग प्रॉब्लेम काय आहे? माझे प्रतिसाद प्रकाशित होतात याचा अर्थ ते प्रकाशित होण्याच्या पात्रतेचे आहेत. इतरत्र किंवा इतर गझलांवर मी काय करतो याबाबतचे विधान मला इथे अप्रस्तूत वाटते.


त्यामुळे मी आपल्या निकषांवर खरा उतरत नसेनही कदाचित पण इतर जाणकार मनोगती गझलकारांना ही गझल आवडली हे समाधान मला पुरेसे आहे.

हा आपला प्रश्न आहे. मला यात काहीही आडचण नाही. आपल्या 'मला भावलेल्या' गजलांवर मी तसेच प्रतिसाद दिलेले आहेत हे आपण जाणता.

जयन्ता५२
भूषण कटककर