सगळे सामाजिक शेर आले की गझलियतची उणीव जाणवणे वगैरे.
भूषण,
माझ्या या गझलेत 'गझलियत' नाही असे सरळ म्हणा हवे तर! पण 'गझलियत' चा संबध हा गझलचा विषय किंवा आशय हा सामाजिक, शृंगारिक वा आध्यात्मिक असण्याशी कसा काय निगडीत आहे? आपले विधान हे एक 'स्वीपिंग स्टेटमेंट' /(सर्वसमावेशक) आहे. मी या गझलेत एखादा भावुक/प्रेमभावनेचा शेर लिहला असता तर आपल्यामते मग गझलियत आपोआप आली असती काय?
आपली स्वतःची काही वैयक्तिक मते, ग्रह आहेत. (उदा. मी मुक्तछंद मानीत नाही. फिनिक्सच्या 'थकवा'हा कवितेला आपण दिलेला प्रतिसाद) तुम्ही मुक्तछंद मानीत नाही असे म्हटल्यावर मुक्तछंदावरची तुमची समीक्षा ही नकारात्मकच असणार यात नवल काय? वैयक्तिक मते, ग्रह बाजूला ठेवून आस्वाद घेतला पाहिजे तरच तो खरा. अन्यथा, प्रतिसाद किंवा समीक्षा ही पूर्वग्रहदूषित नसल्याची उणीव जाणवणे सहज शक्य होते. या अशाच निकषावर आपण अनेकदा गझलांची टोकाची समीक्षा करता असे आतापर्यंतच्या अनेक प्रतिसादातून सहज लक्षात येते.
त्यामुळे मी आपल्या निकषांवर खरा उतरत नसेनही कदाचित पण इतर जाणकार मनोगती गझलकारांना ही गझल आवडली हे समाधान मला पुरेसे आहे.
जयन्ता५२