भूषण,
मी वाचलेल्या माहितीप्रमाणे गझल या मूळ शब्दाचा अर्थ स्त्रीशी केलेला संवाद असा आहे; पण गझल अगदी गालिबपासूनच सामाजिक विषयांकडे वळली.
जयंतरावांची ही गझल सगळे सामाजिक शेर घेऊन आल्यामुळे मुस्सलसल (एकाच अर्थाचे अनेक शेर) या प्रकाराची आहे आणि तिच्यात गझलियत नाही हे म्हणणं चुकीचं आहे असं मला वाटतं.
अशीच एक दुसरी पटकन आठवलेली गझल म्हणजे पाडगावकरांची 'जमाखर्च स्वातंत्र्याचा' ही.
उदा. एखादी स्त्री सुंदर आहे की नाही, हे आपण म्हणू शकतो / त्यावर मतं वेगवेगळी असू शकतात; पण ती स्त्रीच नाही हे आपण म्हणू शकत नाही.
मुक्तछंद - हा एक छंदाचा प्रकार आहे आणि त्याचेही काही नियम आहेत. अनेक कवी छंदमुक्त लिहितात आणि त्यामुळे तो आपल्याला 'काव्यप्रकार न मानण्यासारखा' वाटतो.
- कुमार