ज्या प्रमाणे, सामायीक चलन "जपणे" हे राष्ट्रिय कर्तव्य त्याच न्यायाने...

जर सामायीक चलन नष्ट करणे हा गुन्हा होवू शकतो...


मुळात समाईक चलन जपणे हे "कर्तव्य" का असावे?

समजा माझ्याकडे हजार रुपयांच्या (किंवा तूर्तास भारतात सर्वात जास्त मूल्य असलेली जी कोठली चलनी नोट असेल त्या मूल्याच्या) नोटांचा एखादा गठ्ठा असेल, आणि जर मी तो जाळला, तर त्यातून माझे स्वतःचे तितक्या रुपयांचे नुकसान होत असल्याने तो मूर्खपणा ठरेल हे मी समजू शकतो, पण तो दखलपात्र गुन्हा का ठरावा?*


मुळात हे कायदे कधी, कोणत्या राजवटीखाली आणि कोणत्या मानसिकतेने झाले हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

*उलट, तो गठ्ठा जाळून तितक्या नोटा (आणि पर्यायाने तितके रुपये) चलनाबाहेर काढून (आणि पर्यायाने चलनातून कमी करून), मागणी आणि पुरवठा तत्त्वाप्रमाणे मी रुपयाची (आणि पर्यायाने समाईक चलनाची, भारताच्या एका राष्ट्रीय चिन्हाची - नॅशनल सिंबलची) किंमत आणि खरेदी करण्याची ताकद (पर्चेसिंग पॉवर) अगदी थोड्या अंशाने का होईना, पण वाढवत आहे (आणि त्याद्वारे रुपयाची शान वाढवत आहे), त्यामुळे प्रचंड वैयक्तिक नुकसान सोसून, प्रचंड वैयक्तिक मोल देऊन, प्रचंड वैयक्तिक त्याग करून हे मी एका प्रकारचे राष्ट्रकार्यच  करत आहे, तेव्हा माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी उलट भारतरत्न पुरस्कार देऊन माझा गौरव करण्यात यावा, असा उलटा दावा करण्यास माझ्याजवळ जागा आहे, असे वाटते. (भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी जर भारतीय नागरिकत्वाची किमान अट असेल आणि ती आड येत असेल, तर त्याऐवजी अभारतीय नागरिकास देता येऊ शकणारा सर्वोच्च राष्ट्रीय बहुमान स्वीकारण्यास मी तयार आहे.)