ऑफिसातल्या फायलीला धारिणी म्हटले तर एकवेळ चालेल. ती अनेक कागद धरून ठेवते. संगणकीय फायलीचे तसे नसते. तिला फाइल असेच म्हणावे.

(आयायटीत अनेक मुलाखतींना जाताना, समूह चर्चेच्या वेळी वगैरे एक चुणचुणीत विद्यार्थी भाव खाण्यासाठी नेहमी (निष्कारण) एक फाइल हातात घेऊन जात असे. त्याला आम्ही फाइलवेडा म्हणत असू!)