मी सहसा (कॉलेजच्या दिवसांपासूनच) ही असली गिरिभ्रमणाची वर्णने आली की अगदी आवर्जून वाचतो. सुदैवने जालावरही सुळसुळाट असतो त्यामुळे वेळ चांगला जातो.; )
अगदी असेच.
चौकसराव,
सुरेख वर्णन. असेच आणखी वाचायला आवडेल.
आम्ही हल्लीच केलेल्या विसापूर भटकंतीची आठवण झाली. एका जालमित्राच्या कृपेने विसापूरला सहज जाता येते असे कळले, मग वाट काढत विसापूरवर जाऊन पोचलो. वाटेत काही ठिकाणी बाण आहेत त्यामुळे रस्ता चुकलो नाही. वर विस्तीर्ण पठार आहे आणि वारा भणाणत असतो. वर पाणी मात्र अजिबात नाही. ते बरोबर घेऊन जावे लागते.