तुमचं म्हणणं पटलं.   "उत्कृष्टतेचा जरूर आग्रह धर, पण वरवरच्या आभासाला भुलू नको."

एखाद्या गोष्टीची उपयुक्तता आणि तिच्यातले दुर्गुण यांचा विचार करुन मगच ती गोष्ट वापरायची का नाही याचा निर्णय व्हावा.  स्वदेशाभिमानाचं अवडंबर पण माजवू नये पण तसंच कुठचीही गोष्ट 'इंपोर्टेड' आहे म्हणून लगेच अंगिकारूही नये.  विशेषतः लहान मुलांच्या तर हे अंगवळणी पाडणं फार महत्त्वाचं असतं. या वयात काय योग्य, काय अयोग्य हे ठरवण्याची क्षमता कमी असते.  त्यामुळे पालकांनी प्रत्येक गोष्ट विकत घेताना हे काळजीपूर्वकपणे डोक्यात ठेवणं फार आवश्यक आहे.