अनेकांना माहीत नसल्याने या दोन प्रकारांची सर्रास अदलाबदल करून छातीठोकपणे विधाने केली जातात. वर जावडेकर साहेबांनी मांडलेला मुद्दा - छंदमुक्त व मुक्तछंद फरक - योग्यच आहे.

नक्की आठवत नाही, पण या दोन प्रकारांतला फरक स्पष्ट करणारे संदर्भ मनोगतावरच एका चर्चेत भूतकाळात आले होते. संबंधित चर्चेचा दुवा कोणी दिल्यास खूप उपयुक्त ठरेलसे वाटते.

छंदमुक्तातील किंवा/आणि मुक्तछंदातील कवितांचा आस्वाद मी घेतोच(म्हणजे सगळ्यांनीच तो घ्यावा, असा नियम मुळीच नाही/नसेल); या प्रकारांतील अनेक निवडक कविता, प्रसिद्ध गीते यांचा आस्वाद आपण सगळेच कित्येकदा घेत आलो आहोत. एकंदर माझ्या मते, छंदमुक्त कविता म्हणजे 'कविता' नाहीच, असे मानायचे काही कारण नाही. कोणा एका क्ष व्यक्तीच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि मानणे/न मानणे या गोष्टी हा साहित्यप्रकार एक मान्यताप्राप्त काव्यप्रकार असण्याच्या आड येणे शक्य नाही, असे मला वाटते.