इंग्रजी भाषेचे नागरिकांना असलेले आकर्षण पाहिले, की मराठी भाषा हळूहळू नामशेष होत जाणार, किंवा समाजातल्या काही 'मागासलेल्या' किंवा कदाचित 'बुरसटलेल्या' वर्गापर्यंत मर्यादित राहणार असे वाटते. मराठी आईने मुलाला सांगितलेली कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही गोष्ट ऐकली आहे कुणी?
एक fox होता. एकाठिकाणी उंचावर काही ग्रेप्स लटकत होती... त्याने जंप करून ती खायचा प्रयत्न केला.... पुढील ऐकवले नाही.
आता शिशू असलेली पिढी त्यांच्या शिशूंना ही गोष्ट पूर्ण इंग्रजीत सांगेल, या बाबत शंका नाही. वरील उदाहरण मुंबईतील नसून मुंबईबाहेरचे आहे. एक दोन पिढ्यांनंतर छोट्या गावांमध्येही असेच इंग्रजीचे स्तोम (तेव्हा खरेतर ते स्तोम नसेल, दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने ती गरज असेल) माजलेले असेल.