जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाबद्दल सध्याच्या काळात समाजात बऱयापैकी जागरुकता निर्माण झाली आहे. विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आदी प्रसारमाध्यमातून त्याविषयी वेळोवेळी माहिती मिळत असल्याने आबालवृद्धांच्या मनात आता ग्रहण तसेच अन्य खगोलशास्त्रीय घटनांबद्दल उत्सुकता निर्माण झालेली असते. मराठी विज्ञान परिषद आणि अन्य संस्था, संघटना ग्रहण किंवा अशा विशेष खगोलशास्त्रीय घटनांसाठी सहली काढणे, काही मंडळींना एकत्र आणून त्याची शास्त्रीय माहिती देणे अशी कामे करत आहेत. त्यामुळे आता ग्रहण म्हणजे आपत्ती न मानता एक पर्वणी मानण्यात येते. खगोलअभ्यासक, ...