टोकरे त्यांच्या ऐन उमेदीच्या दिवसांमध्ये एका व्यावसायिक समाजहितरक्षक संघतनेत 'डेंजर टोकऱ्या' या व्यावसायिक नावाने सुपरिचित होते. अशाच काही सामाजिक महत्त्वाच्या वादांतून एका समाजविघातक घटकाचा त्यांनी कायमचा निकाल लावला. या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्या संपूर्ण भोजन आणि निवासाची जबाबदारी चौदा वर्षे सरकारने उचलली होती. त्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तथापि मानद सल्लागार या नात्यानं अजूनही त्यांचा या क्षेत्रातील विविध संघटनांशी संपर्क होता.
वा! काय भाषा आहे. तुमचा अनुभव बराच 'व्यापक' दिसत आहे. चालू दे चालूदे.