१) एक तयार जमीन घ्यायची, गजल असली तर तेच काफिया-रदीफ घेऊन त्यात अत्यंत आचरट असे विषय, जसे अनैतिक संबंध, नशापान, अवयवांचे वर्णन वगैरे करायचे ( पोट फार सुटले वगैरे )
मग खालील काव्य काय वेगळे आहे?
पिवळे झाले अजून तितके नसे तुझे..
अजून, थोडे अजून, रगडायला हवे
नासणार ही अशीच बहुधा हयात रे..
मुली मिळाल्यावरी परवडायला हवे
बनू लागता सपट लोशने गजलांची..
इथे न आता कुल्ल्यांस दुखायला हवे....
२) जयंतरावांनी जे विधान केले आहे की एक तास तरी थांबायचे, यातील क्लेष हा अभिरुची घसरल्यामुळे चांगल्या कवितेला वाव मिळण्याची शक्यता घटते या भावनेतून आला असावा अशी माझी खात्री आहे. पण त्यांच्या त्या म्हणण्यालाच करमणुकजनक प्रतिसाद समजले गेले आहे.
---- हा हा! तुम्हाला त्या प्रतिसादातली गंमत कळलीच नाही. मी खरं म्हणजे केशवाच्या शीघ्रकवित्वाला दिलेली ती दाद आहे. कसला क्लेश? केशवाच्या लिखाणाचा क्लेश? यू मस्ट बी जोकींग!
मी, चक्रपाणि व केशवसुमार एकमेकांना अनेक वर्षे एकमेकांच्या लिखाणातून आणि एरव्ही ओळखतो. त्यामुळे चक्रपाणिला माझ्या प्रतिसादातील 'क्लेश' (हा हा) नकळल्यामुळे तो 'करमणुकजनक प्रतिसाद' समजला गेला असे फक्त तुम्हाला वाटते. आम्हा कोणालाच नाही.मला क्लेश झाला हे मला तुमच्या लिखाणातुनच कळले!
ह्या सर्व प्रकाराने मात्र छान करमणुक झाली.
जयन्ता५२