कटककर,
फार आता फार झाले ह्या जयंतरावांच्या गझलेत गझलियत नाही ह्या आपल्या विधानाशी १००% असहमत आहे.
गझल हा काव्यप्रकार मुळातच काही रंग घेऊन आला आहे. त्यात प्रेम, विरह, अनुभुती ( म्हणजे अनुभव नाही ), व्यथा, विश्वाच्या अतर्क्यतेशी जवळीक या गोष्टी असायच्या अन असतात.
ह्या आपल्या वैयक्तिक मताबद्दल मी येव्हढच म्हणू शकतो की, आदरणीय सुरेश भटांनी दिलेल्या गझलेची बाराखडी मधील शेवटी महत्वाचे या भागातील खालील दोन परिच्छेद पुन्हा वाचावे आणि मग आपले वैयक्तिक मत पुन्हा तपासून पहावे ही नम्र विनंती.
३. बदलत्या काळाच्या संदर्भानुसार गझलेमधील शेरांचे संदर्भ बदलू शकतात. पण गझल म्हणजे काय हे कवीच्या सोयीनुसार ठरत नसते- आणि ते समीक्षकांच्या सोयीनुसार नव्हेच नव्हे!
४. मराठी गझलेसाठी आवश्यक असलेली प्रतिमा, रूपके आणि संकेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात भरपूर आहेत. मराठी गझलेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे.
अनिरुद्ध अभ्यंकर.