आजच्या लोकसत्तेत हा धमाल अग्रलेख वाचायला मिळाला :

नेपथ्यरचना यथास्थित झाली आहे. प्रकाशयोजना तयार आहे. ऑर्केस्ट्राने सूर-ताल सिद्धता पूर्ण केली आहे. ध्वनियोजनाही एकदम व्यवस्थित आहे. सर्व पात्रांचे संवाद मुखोद्गत आहेत. तरीही प्रॉंप्टर सज्ज आहे-समजा, ऐन वेळी कुणी संवाद विसरलाच तर? अजून दुसरी घंटा व्हायची आहे. ती उद्या म्हणजे १३ तारखेला, शेवटच्या फेरीचे मतदान झाले, की दिली जाईल. तिसरी म्हणजे ‘शेवटची’ घंटा १६ तारखेला सकाळी आठ वाजता होईल आणि लगेच पडदा वर जाईल.  या नाटकाबद्दल कधी नव्हे इतकी उत्सुकता सर्वत्र आहे; पण थोडा गोंधळही झाला आहे. थिएटरचे बुकिंग करणाऱ्याने एकदम तीन नाटक कंपन्यांना एकाच वेळचे बुकिंग दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेहमीचे यशस्वी कलाकार, भाजपचे कधी कधीचे यशस्वी कलाकार आणि तिसऱ्या आघाडीचे नेहमीचे अयशस्वी कलाकार, असे सर्व जण मेकअप करून विंगेत तयार आहेत. .....

पुढे वाचा : दुसरी घंटा