वा! काय भाषा आहे. तुमचा अनुभव बराच 'व्यापक' दिसत आहे. चालू दे चालूदे.
सहमत. आतापर्यंत तरी मजा येत आहे.
पण एक शंका आल्यावाचून राहवत नाही. अशी होतकरूंना प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ पावटे बनवण्याची योजना ही कधी ना कधी स्वतःविरुद्धच जाणारी (सेल्फ-डिफीटिंग) होणार नाही का? म्हणजे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे पावटे पुढेमागे कधी ना कधी संस्थापकांशी प्रतिस्पर्धा करणाऱ्या टोळ्या प्रस्थापित करून गुरुदक्षिणा म्हणून गुरूची विद्या गुरूवरच उलटवणार नाहीत का?