श्री. रावले साहेब,
आपले विचार मला तरी मान्य आहेत. तसेच,
*उमेदवाराचे कमीतकमी पदवीपर्यंत शिक्षण झालेले असणे व त्याला स्थानिक, हिंदी व इंग्लिश या भाषा जरुरीपुरत्या येणे
* उमेदवाराला काहीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे व त्याचा पुरावा असणे
* त्याने कमीतकमी ३ वर्षे कुठलेही पद न स्वीकारता काही ना काही सामाजिक कार्य केलेले असणे. ( म्हणजे फक्त याचा किंवा त्याचा मुलगा आहे म्हणून राजकारणात येऊन पदाधिकारी झाला, असे होऊ नये )
* त्याची लोकप्रियता ही सामाजिक कार्य करणारा अशीच असणे आवश्यक ठरणे, म्हणजे अभिनेते, क्रिकेटपटू यांनी आपली लोकप्रियता वापरून त्या पक्षाला विजय मिळवून देण्याचे होणार नाही.
* मतदारांना, पाच वर्षातून कमीतकमी एकदा तरी अशी संधी मिळणे की त्याच निवडून दिलेल्या उमेदवाराला पद टिकवण्यासाठी किंवा सोडण्यासाठी पुन्हा मतदान करण्याचा अधिकार मिळणे.
* 'यातील कुठल्याच उमेदवाराला मत द्यायची इच्छा नाही' असेही एक ऑप्शन ठेवून त्यातील मतदानाची संख्या मोजून ते विचारात घेणे.
मुळात, नुसती निवडणूक प्रक्रियाच मतदानातील निरुत्साहाला कारणीभूत असेल असे वाटत नाही. उमेदवारांचे इतिहास, विश्वासार्हता व निवडीला बाकी काहीच वाव नसणे यातूनही उद्विग्नता येत असावी. ( हे बहुतांशी उमेदवारांना लागू आहे. कुणी अशीही उदाहरणे देईल की एखादा उमेदवार खूप निर्मळ चारित्र्याचा आहे वगैरे! ).
हा चर्चा प्रस्ताव व त्यातील मते मला मान्य आहेत व त्यासाठी आपले अभिनंदन!