रोचक चर्चाप्रस्ताव आहे. मुली "अश्याच" वागतात, दिसतात हे डोक्यात असते. मात्र त्या तसे का करतात असा विचार करणेच रोचक आहे. माझ्या मते हे सर्वस्वी नैसर्गीक नसावे. लिंगभेदाचे ज्ञान येईपर्यंत लहान मुल फार वेगळे वागते असे कधी वाटले नाहि. मात्र आपण स्त्री आहेत अशी जाणीव झाल्यावर इतर "स्त्री" म्हणवणाऱ्यांचे वर्तन अनुकरण करण्याकडे कल असावा.

एक भारतातील उदा. पाहु. समजा जर एखादी मुलगी गोट्या खेळू लागली, ज्याला पुरुषी म्हणतात ते कपडे घालून अथवा विषिष्ट अंगविक्षेप करून (जसे बिंदास पाय फाकवून बसणे, सायकलीवर आडवे न बसता / पुढून पाय न टाकता मांड टाकणे वगैरे) करू लागली तर इतर समाज (ज्यात पुरुष व स्त्रीया दोन्ही आल्या) त्यांना विविध मार्गांनी हे स्त्रीयांनी करणे चुक आहे असे ठसवतात.

अर्थात स्त्रीयांचे अथवा पुरुषांचे विषिष्ट वागणे/सवयी/लकबी ह्या प्रत्येक संस्कृतीत/प्रदेशात वेगळ्या असतात तेव्हा त्या नैसर्गिक असावे असे वाटत नाहि

(अकृत्रिम) ऋषिकेश