१. इ मतदान यंत्रणेद्वारे भारतात व भारतिय दुतावासात कुठेही मतदान करता आले पाहिजे.
२. "यापैकी कोणिही नाही" चा पर्याय हवाच जेणेकरून गुंड लोकसभेत जाणार नाही.
३. फौजदारी गुन्हा दाखल असणाऱ्यांना निवडणुकीस अपात्र ठरवावे.
४. निवडणुकपुर्व झालेली युती बंधनकारक असावी.
५. निवडणुकीनंतर बाहेरून पाठींबा चालेल मात्र निवडणुकीपुर्वी युती नसल्यास नंतरही ती अमान्यच असावी. (जसं पक्षांतर बंदी कायदा आहे तसं. )
६. मतदान बंधनकारकच असावे.
७. क्रेडीट कार्डसारखे निवडणुक कार्ड असावे आणि बायोमेट्रीक (अंगठ्याचा ठसा) पद्ध्तीचा वापर आवश्यक करावा जेणेकरून बोगस व दुहेरी मतदार आणि मतदान टाळता येइल.
८. जाहिरनाम्यांनुसार कामे न केल्यास पक्षाच्या खासदारांना न्यायालयात खेचण्याची मुभा असावी. थोडक्यात जाहिरनामा वचनपत्राप्रमाणे (अफेडिव्हेट) असावा.
९. कोणतीही गोष्ट मोफत देण्यास बंदी हवीच.
१०. राष्ट्रिय व आंतरराष्ट्रिय मुद्द्यांवरिल धोरण हे आधिच ठरवलेले असावे आणि तसे वागत नसल्यास सरकार खेचण्याची ताकद जनतेत असावी. (यावर कसे ? हे अजुनही मला सुचलेले नाही. )

चांगल्या विषयासाठी धन्यवाद