मुंबईतील मराठी माणसाची अवस्था पाहून सर्वत्र ती अवस्था आहे असे गृहीत धरण्यात येत आहे

असे गृहित धरल्याचे दिसत नाहि. मात्र मुंबईला अनेक बाबतीत प्राधान्य मिळते असे मात्र पटते. आणि ते होण्यात काहिही गैर वाटत नाहि.

याचे साधे कारण असे मुंबई आणि परिसर मिळून (६ मुंबई + ४ ठाणे) १० लोकसभेच्या जागा देतो.. असे एक तरी शहर इतक्या जागांचे प्रतिनिधित्त्व करते का?

शिवाय महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या साधारणतः २५% (१५% मुंबईत व१०% ठाणे+नवी मुंबई) जनता या एकाच परिसरात राहत असेल तर अर्थातच मुंबईस प्राधान्य मिळणार.

अमेरीकेतही जरी बऱ्याचशा राजधान्या छोट्या शहरांत असल्या तरी ते केवळ प्रशासकीय सोयीसाठी आहे असे वाटते. सर्वत्र प्रश्न मोठय शहरांचेच प्राधान्यक्रमाने प्रकाशात येतात. आल्बनी राजधानी आहे म्हणून चित्रपट आल्बनीतील लोकांच्या समस्या मांडत नाहित अथवा अल्बनीमध्ये घडत नाहित. तेव्हा राजधानी कुठेही असली तरी आर्थिक, राजकीय सत्ता जिथे एकवटली आहे तेथील नागरीकांना प्राधान्य मिळतेच.

किंबहुना असे महत्त्व मिळाल्यानेच हि शहरे मोठी झाली आहेत.

मुळातच हि चर्चा जर मुंबईतल्या समस्यांवर चित्रपट का निघतात अशी अपेक्षीत असेल तर त्या दिग्दर्शकाला/निर्मात्यालाच विचारा असे उत्तर देता येईल

-ऋषिकेश