माय आयडीया. को. इन दुवा क्र. १ ह्या संकेतस्थळावर ही अनेकांनी निवडणूक प्रकिर्ये संबंधित आप-आपली मते प्रदर्शित केलेली आहेत. त्यातील एक कल्पना मला आवडली ती अशी. की "उमेदवार म्हणून जी व्यक्ती निवडणूकीस उभी राहू इच्छीते तीने (निवडणूक आयोगाद्वारे घेता येईल अशा) एखाद्या चाचणी परीक्षेत उत्तीर्ण व्ह्यावे. ही चाचणीद्वारे आपले विचार व्यवस्थित, मुद्देसूद व पद्धतशीर पणे बोलून व लिहून मांडता यायला हवेत. संसदेत वा विधानसभेच्या विविध कामकाजांची पूरेशी माहीती देता यायला हवी. खासदार निधी मिळवण्यापासून ते तो व्यवस्थित खर्च कसा करायचा याची माहीती ही त्या व्यक्तीला देता यायला हवी. "
ह्या चर्चेत जास्तीत जास्त मुद्दे पद्धतशीरपणे मांडले जातील तर ते व्यवस्थित संकलित करून त्याची एक प्रत पत्राद्वारे भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती व एक प्रत निवडणूक आयोगाकडे पाठविण्याचा माझा मानस आहे.