"वेळ असावी फुलपाखरू
हळूच भुर्रकन यावी जावी
खांद्यावर हुळहूळ करताना
खुदकन एक कविता निसटावी

साथ मुलायम संग सुरमयी
गंध मंद अन रंग सावळा
शब्दामध्ये मौन गोजिरे
मौनामध्ये शब्द कोवळा"             ... व्वा, मस्तच लिहिलंत !