कथा फारच छान आहे.
शिकवणाऱ्याचे नाव 'दिवेकर' असल्याचे वाचून कुठेतरी घंटा वाजली होती. पण शेवटी दिलेला अनपेक्षित ठोसा (पंच! ) अगदी भारी!  
सद्यपरिस्थितीचे मार्मिक सूक्ष्मनिरीक्षण आणि अगदी दैनंदिन अनुभवविश्वातले, तरीही  काहीसे ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने केलेले चित्रण फारच प्रभावी वाटले.   
चुडामणी आणि त्यांची शिक्षणसंस्था, पावटॉलॉजी मधले थिअरी आणि प्रॅक्टिकलचे विषय, शिक्षणसंस्थेची जागा कशी मिळवली याबद्दलचे मौलिक विचार ( हे काल्पनिक नसावेत असा संशय घ्यायला जागा आहे का? ), 'गेस्ट फॅकल्टी' म्हणून येणारे 'इंडस्ट्रियल एक्सपर्टस' हे सगळेच अगदी उत्तम उतरले आहे. सही सही.

--अदिती 

ता. क. तळटीप वाचून इन्स्पेक्टरांचे नाव अर्थातच प्रधान कसे हे कोडे उलगडले!