प्रदीपराव,

ही रचना खरोखरच अप्रतिम आहे.

अत्यंत साधी शब्दरचना, मूलभूत गोष्टींना टच करणे, कुणालाही आपल्या मनातील विचार आहेत असे वाटणे अन म्हणताना जिभेला काहीही कष्ट न पडणे!

व्वा!

मनाजोगे नवे काहीच करता येत नाही!
जुने विसरूनही काही विसरता येत नाही! - सुंदर! मात्र दोन ओळींमधले कनेक्शन लक्षात आले नाही.

स्वतः होऊन कोणीही शहाणा वा न वेडा...
तसे कोणासही काहीच ठरता येत नाही! - अप्रतिम!

तरू उंचावुनी बाहू, नभाला दुःख सांगे...
'मला बहरायचे आहे... बहरता येत नाही! ' - पुन्हा अप्रतिम!

पुन्हा ये जन्मठेपेची सजा भोगायला तू...
... असे वाटेवरी अर्ध्याच मरता येत नाही! - सुंदर शेर!

उगा देतोस चंद्राला कशाला दूषणे तू?
तुला हे चांदणे रात्रीत भरता येत नाही!   - सुंदर शेर!

चुका केल्याच मी नाहीत, केली चूक ही मी...
गुन्हा माझ्यावरी त्यांना गुदरता येत नाही!  - केली चूक ही मी! व्वा वा!

तुझ्या देहात आहे बेट पाचूचे... खरे का?
म्हणे कोणासही तेथे उतरता येत नाही! - हा शेर मात्र समजला नाही. ( आशय लक्षात आला, पण देहात या शब्दाचे प्रयोजन समजले नाही. )  - 'ऱ्हुदयात' असा अर्थ मी घेतला! चु. भू. द्या̱. घ्या.

पुढच्या गझलेच्या प्रतीक्षेत!

भूषण कटककर