चक्रपाणिसाहेब,
प्रतिसादासाठी मनापासून आभार!
आधी खरे तर मी 'भासशी तू हेर मृत्यूची अताशा दक्षते' असे करणार होतो. काय झाले माहीत नाही, एकदम 'जासूस' घेणे बरे वाटले. ( 'आराम घे' यावर मात्र मी काहीही विचार केला नाही. )
पण माझा एक विचार आहे. गझल उर्दूमधून मराठीत आलेली आहे. काही शब्द तिथून घेतले तर काय हरकत आहे?
पण इंग्लीश भाषेत मात्र अजूनही गझल नाही. तसेच, ती त्या भाषेत जन्मली तरीही ती वेगळ्याच भूमीची भाषा आहे. म्हणून मी गझलेत कधीही इंग्लिश शब्द घेत नाही. अगदी टेबल, पेन, सुद्धा!
आपले मत समजल्यास बरे वाटेल.
धन्यवाद!