मी पूर्णपणे सहमत आहे...की...

१. जे मनोगतावर "उपलब्ध" नाहीत त्यांच्याबद्दल मनोगतावर टिकाटिपण्णी करू नये.

२. पुढे जाऊन असं पण म्हणूयात की पेशवे इथे मनोगतावर उपलब्ध नाहीत म्हणून त्यांच्यावर टिकाटिपण्णी नको करूयात. बरोबर!? छान!

३. आणि आत तुम्ही माझ्याशी पूर्णं सहमत असाल की ज्या ब्राह्मणांच्या पिढ्यांवर इतरांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे त्या पण मनोगतावर उपलब्ध नाहीत. मग त्यांच्यावर पण टिकाटिपण्णी इथे नको.

आपण सगळे सुसंकृत, जबाबदार आणि समजूतदार मनोगती आहोत... आणि आपलं सगळ्यांचं या वरच्या तीन मुद्द्यांवर एकमत असेल अशी आशा करतो.

छान आता आपण मूळ चर्चेकडे वळूयात... की अजून किती झोडपणार आहोत ब्राह्मणांना? आणि त्यातून काय साध्य करणार आहोत?

ब्राह्मणांनाच काय, समाजाच्या कोणत्याही घटकाला झोडपून समाजाचे आणि पर्यायाने देशाचे काही भले झाल्याचे उदाहरण माझ्या माहितीत तरी नाही.

उलट द्वेषामुळे देश रसातळाला जातो हे जर्मनीच्या(१९३२-१९४५) उदाहरणावरून स्पष्ट होते. आणि त्या द्वेषामुळे ज्यूंची तात्कालिक हानी झाली तरी १९३२-१९४५ मधल्या घटनांमुळेच त्यांच्यातला एक मोठा गट आजच्या जागतिक महासत्तेवर सत्ता गाजवतो. त्यांच्यातल्याच एका माणसाच्या संशोधनामुळे दुसऱ्या महायुद्धावर पडदा पडला आणि उर्जाक्षेत्रात क्रांती झाली.

आणि असे आपापसात वाद घालून आपण आपल्या भारत देशासमोरचे लोकसंख्या आणि निरक्षरता हे दोन प्रश्न कसे सोडवतो हे मला तरी अगम्य आहे.

इतिहासातून शिकावं म्हणतात!
जर का इतिहासातून आपण असा निष्कर्ष काढू इच्छिता की समाजाच्या एका घटकाने दुसऱ्या घटकाला दाबून ठेवले, दुःस्वास केला, आणि त्यामुळे देशाचे नुकसान झाले तर मग आजच्या घडीला तोच कीत्ता गिरवून आपण काय साधणार आहोत? देशाची प्रगती तर निश्चितच नाही, मग असुरी आनंद?... ते तुम्हीच ठरवा बुवा!

चू.भू.द्या.घ्या.
-भोमे-काका