जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
इंटरनेट म्हणजे खरोखऱच माहितीचे प्रचंड मोठे मायाजाल आहे. यात भ्रमंती करत असताना विविध प्रकारची नवीन माहिती, तर कधी आपल्या समान विचारांचे, आवडीचे मित्रही मिळू शकतात. त्या दिवशी सहजच ऑर्कूटवर (नेमके कुठे ते आठवत नाही) बहुधा चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण किंवा चित्पावन युवा संघ या कम्युनिटीवर अभिजीत बापट या युवकाचे प्रोफाईल वाचले. तो संभाजीराव भिडे यांनी स्थापन केलेल्या श्री शिवप्रतिष्ठानचा सदस्य आहे. ऑर्कूटवर या कम्युनिटीचा ओनर अशी त्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील समग्र गड, किल्ले आणि दुर्गांची माहिती त्याने उत्तमरित्या संकलित केली आहे. श्री ...