सिद्धाराम यांचे लेख येथे हे वाचायला मिळाले:
श्रीनिवास रामस्वामी हे "चो' रामस्वामी या नावाने ओळखले जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे ते प्रभावी भाष्यकार आहेत. तामिळनाडूतून प्रकाशित होणाऱ्या तुघलक या लोकप्रिय नियतकालिकेचे ते संपादक आहेत. विख्यात वकील आणि अभिनेता तसेच स्तंभलेखक असलेल्या रामस्वामी यांची विशेष मुलाखत "रेडिफ' या अग्रगण्य वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीचा संपादित अंश येथे देत आहोत.