कविता उमेद कवीची मरगळ झाडून टाकते

विडंबन तगडे असे कवितेस झाकून टाकते ॥

कविता जणू नवी नवरी भाववेडी फाकडी

विडंबन दादला धटिंगण वळते कवितेची बोबडी ॥

कविता रमविण्या जनां नवरसांचे चाळ बांधते

विडंबन राजा रसांचा निखळ हास्य ओठी विलसे ॥

कविता सत्यभामा पुराणी स्वर्गीय प्राजक्तवेडी

विडंबन खट्याळ नारद कृष्णासही घाली बेडी ॥

स्वांतस्सुखे परमार्थ साधणे ती कवितेची मनीषा

रांगडा आनंद लुटणे ही विडंबनास अभिलाषा ॥

... केशवजी, मजा आणलीत.