गोळा भजी ही, मेथीची पाने, अर्धवट कुटलेले काळेमिरे, लाल तिखट, मोहन, मीठ व खायचा सोडा चण्याच्या पिठात घालून, पिठ थोडे घट्ट भिजवून, सुपारीच्या आकाराचे गोल-गोल गोळे करून तळून घेतात. ह्या गोळा भज्यांना 'गोटे' म्हणायचीही पद्धत आहे. मुंबई - अहमदाबाद रेल्वे मार्गावर आणंद नांवाचे स्टेशन लागते तिथे द्रोणातून मिळणारे 'गोटे' प्रसिद्ध आहेत.