मी ह्या विशयासंबधित काही मुद्दे जे वस्तुस्थितीचे भान ठेवत व अतिशयोक्ती टाळत संकलित केलेले आहे. ते कृपया

(प्रामुख्याने शिक्षक, अध्यापक तसेच वकिल या पेशातील सभासदांना विनंती) पाहावेत व भाषेत, शब्दांमध्ये वा

वाक्यरचनेमध्ये सुधारणा करण्यास जागा असेल तर बदल जरूर सुचवावेत.

---------------------------------
भारताचा नागरीक म्हणून माननीय राष्ट्रपतींसमोर काही विनंत्या!

मतदारांसाठी :
डटा कॉअरडिनेशन व एकच ओळखपत्र:-
1. वयात येणाऱ्यांची, शहरात/गावात नव्याने येणाऱ्यांची, नाव बदललेल्यांची, मृत्यू झालेल्यांची नोंद तात्काळ होणे गरजेचे.
2. मतदार ओळखपत्र ही क्रेडीट कार्डा सारखी त्या मतदाराची माहीती (उदा. पत्ता, रेशन कार्ड, पॅन कार्ड क्रमांक,ड्रायविंग लायसेन्स, बॅंक खाते क्रमांक, विज मिटर क्रमांक) साठवून ठेवणारी व्हायला हवीत. आणि बायोमेट्रीक (अंगठ्याचा ठसा) पद्धतीचा वापर आवश्यक करावा जेणेकरून एखाद्या मतदाराची एका पेक्षा जास्तवेळा नोंदणी असणे आणि बोगस  मतदान यासारख्या गोष्टी टाळता येइल.
3. प्रत्यक्ष मतदान केंद्रात या ओळखपत्रांची संबंधित यंत्राद्वारे पडताळणी व्हावयास हवी.
4. मतदानानंतर प्रत्येकाच्या कार्डा वरून त्याने किन्वा तिने मत दिले किन्वा नाही ते कळले पाहिजे त्यानुसार काही सवलती पासून त्यांना वंचित केले जावे वा त्यांना आर्थिक स्वरूपात दंड देण्यात याव्यात.
5. अनेक शासकिय, निमशासकिय, खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, सैनिक इत्यादींना अत्यावश्यक सेवेत गुंतल्यामुळे मतदान करण्यापासून वंचित राहावे लागते. त्यांच्या मतदानाची सोय ही व्हावयास हवी. अशांना इ-मतदान यंत्रणेद्वारे भारतात व भारतिय दुतावासात कुठेही मतदान करता आले पाहिजे.
6. निवडणूकीची तारीख सुट्ट्यांच्या तारखांना लागून येता कामा नये. तसेच अतिउन्हाळा, अतिपावसाळा, तसेच अति हिंवाळा अशा कालावधित निवडणूका घेतल्या जाता कामा नयेत.
7. मतदारयादी मतदानाच्या एक दिवस आधी जिथं मतदान होणार आहे त्याठिकाणाजवळ मतदारांसाठी त्यांच मतदान कार्यालय कोठे आहे याच्या पडताळणी साठी ठेवली जावी. तसेच त्याबाबतची माहीती संकेतस्थळावर ही उपलब्ध असावी.


उमेदवारांसाठी चाचणी-
1.
- शाररीक - व्यवस्थित चालता, पळता येणं, न अडखळता बोलता येणं, व्यवस्थित एकू येणं, पाहता येणं ह्याची चाचणी ही घेतली जावी. कोणताही मोठा आजार नसणं. हे ही पाहीले गेले जावे.

- कौशल्यिक - संवादकौशल्य, हजरजबाबीपणा, एखाद्या दिलेल्या विशयावर आपले विचार लिहीता-मांडता येणं. इंग्रजी व आपल्या स्वभाषेतून स्वत:ला व्यक्त करता येणं. उमेदवार म्हणून जी व्यक्ती निवडणूकीस उभी राहू इच्छीते तीने (निवडणूक आयोगाद्वारे घेता येईल अशा) एखाद्या चाचणी परीक्षेत उत्तीर्ण व्ह्यावे. ही चाचणीद्वारे आपले विचार व्यवस्थित, मुद्देसूद व पद्धतशीर पणे बोलून व लिहून मांडता यायला हवेत. संसदेत वा विधानसभेच्या विविध कामकाजांची पूरेशी माहीती देता यायला हवी. खासदार निधी मिळवण्यापासून ते तो व्यवस्थित खर्च कसा करायचा याची माहीती ही त्या व्यक्तीला देता यायला हवी.
- शैक्षणिक -  कमीतकमी पदवीपर्यंत चांगल्या गुणांनी शिक्षण पूर्ण झालेले असावे. त्याला स्थानिक भाषेसह, हिंदी व इंग्लिश या भाषांचे द्न्यान असावे.

2. अपक्ष उमेदवारांना फक्त स्थानिक पातळीवरील निवडणूकीस (नगरसेवक/ ग्रामपंचायत इ. ) उभे राहण्याची मुभा असावी. कारण एखादी धन्याढ वा बाहूबली व्यक्ती ह्या स्तरावर व्यक्तीगत पातळीवर येता कामा नये. कारण राज्य वा राष्ट्रस्तरावर एखादी व्यक्ती फक्त स्वबळावर, पक्षीय राजकारण पायऱ्या न चढता मोठी होत जाते तेंव्हा त्यावर कोणाचेही नियंत्रण वैचारीक स्वरूपात राहत नाही.

पक्षांसाठी :
1. प्रांतिक पक्ष व राष्ट्रीय पक्ष यांमधील अंतर व भेद स्पष्ट केला जावा. सद्य स्थितीत भारतीय घटनेमध्ये प्रांतिय पक्ष व राष्ट्रीय पक्ष यांमद्ये भेद स्पष्ट केला गेलेला नाही.
2. राष्ट्रीय पक्षांना राज्यातील म्हणजे विधानसभेच्या निवडणूकीस उभे राहता ( त्याच - नावाचा, चिन्हाचा, प्रशासकीय यंत्रणेचा व अधिकाऱ्यांचा, अर्थखात्यांचा  वापर करता) कामा नये.  
3. लोकसभेच्या म्हणजे राष्ट्रीय निवडणूकीस उभे राहणाऱ्या पक्ष हा राष्ट्रीयच म्हणजे कमीत कमी तीन राज्यात तरी त्या पक्षाचे संपुर्ण जागा लढवणारा असावयास हवा, अशी अट असायला हवी.
4. पक्षांची वित्तिय खाती ठराविक काळात जनतेसमोर जाहीर करण्यात यावीत. 5. पक्षांना करांमधून सवलत देण्यात यावी. तसेच पैशाची व इतर स्वरूपातील देवाण-घेवाणीवर व्यवसायिक संस्थांनाही सवलत देऊन ह्या व्यवहारांना कायद्याच्या चौकटीत आणणे व त्याचा स्विकार करणे.

युतीं व आघाड्यां साठी:
1. निवडणुकपुर्व झालेली युती बंधनकारक असावी.   निवडणुकीनंतर बाहेरून पाठींबा चालेल मात्र निवडणुकीपुर्वी युती नसल्यास नंतरही ती अमान्यच असावी. (जसं पक्षांतर बंदी कायदा आहे तसं. ) 
2. थोडक्यात जाहिरनामा (राष्ट्रिय व आंतरराष्ट्रिय मुद्द्यांवरिल धोरणांसहीत)  वचनपत्राप्रमाणे (अफेडिव्हेट) असावा.

3. जाहीरनाम्यातून कोणतीही गोष्ट मोफत दिली जाइल असे आश्वासन देण्यास बंदी करायला हवी. कारण हा उघड-उघड भ्रष्टाचारच आहे.
4. निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष अशी भुमिका स्पष्ट झाल्यानंतर  राष्ट्रपतींनी लोकसभेत व राज्यपालांनी विधानसभेत, स्वत:च्या हाताने सत्ताधारी पक्षाचा निवडणूकीतील जाहिरनामा विरोधी पक्षाच्या नेत्याकडे सोपवावा. व ‘त्या जाहीरनाम्यांनुसार सत्ताधारी पक्षाकडून कामे होत आहेत कि नाही हे पाहणे आता विरोधी पक्षाचे काम असेल. ’ असे स्पष्ट व खणखणीत शब्दात सुनवावे. विरोधी पक्षाच्या नेत्याद्वारे शपथ घेवून राष्ट्रपतींच्या शब्दाचे पालन केले जाईल हे कबूल केले जावे.

-----------------


राष्ट्रपतींना उद्देशून पत्र लिहायला मी मला कुणी मदत करेल का? पत्राचा आराखडा असा असू शकतो.

 पत्राचा आराखडा

[ नमस्कार!..... ]

[पत्रास कारण की.... निवडणूकपद्धतीविषयीचा आलेला उबग. धनदांडग्यांनी केवळ पैशांच्या व बाहूंच्या बळावर अनैतिक मार्गांनी मिळविलेली सत्ता व त्या सत्तेचा उपयोग स्वत:च्या भावी तमाम पिढ्यांची बेगमी करून ठेवण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न. निवडणूक होण्या आधी व नंतर होणाऱ्या खुल्ल्या व छुप्या आघाड्या करीत सामान्य नागरीकांना गृहीत धरण्याचा प्रयत्न. (थोडी सद्यस्थितीबाबत माहीती विशद करणे)या कारणांमूळे मतदान अत्यल्प होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत 'सामान्य नागरीकास मतदान सक्तीचे करण्यावर विचार केला जात आहे' अशा आशयाचे वृत्त हल्लीच वर्तमान प्रतात वाचले. ही अशी विचार करण्याची पद्धत म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असेच वाटते. ह्या प्रस्तावाद्वारे ]

[ विनंती.... ]

[समारोप.... ]

[शेवट.... पत्र लेखकाचे नाव व पत्ता.... मनोगत ह्या संकेतस्थळावरील सहाय्यकांची नावे..... ]