इंग्रजीत गझल नक्कीच आहे

इंग्रजी भाषेत गझल बऱ्यापैकी रुजली आहे/रुजते आहे, मान्यता पावली आहे/पावते आहे.

इंग्रजीत उगीचच काहीतरी 'आर'-ला-'आर', 'टी'-ला-'टी' आणि 'एफ'-ला-'एफ' (किंवा 'पी-एच'*) जुळवून आपण गझलकार झाल्याच्या बाता मारणाऱ्याला 'ग्यास गझलर' म्हणावे काय?

(ही आपली उगीचच शंका. गझल या प्रकारावर किंवा गझलकारांवर टिप्पणी नव्हे. इंग्रजीत गझल, मराठीत लिमरिक, जपानीत श्लोक, स्वाहिलीत हायकू आणि उर्दूत शार्दूलविक्रीडिते लिहिण्यास माझी व्यक्तिशः काहीही हरकत नाही.)

*अपवादात्मक परिस्थितीत 'जी-एच'सुद्धा चालू शकेल. पहा: कॉफ, लाफ.