भरल्या वांग्यांत बटाटे घालणे ही संकल्पना मला नवीन आहे, परंतु भरली वांगी हा प्रकार एकंदरीत अप्रतिम लागतो खरा.

कुठल्याही गरम भाकरी बरोबर ही भरली वांगी अप्रतिम लागतात.

सहमत. उलटपक्षी भरल्या वांग्यांबरोबर गरम भाकरीच काय, काहीही जरी नसले तरी चालते. (निदान मला तरी.)

या सोबत लसणाची ओली चटणी व ताक असेल तर मग काय फक्कड बेत जमेल, अहाहा...!!!

लसणाची 'ओली चटणी' म्हणजे???

पण 'लसणाची चटणी' हा स्थायीभाव असलेल्या कोठल्याही प्रकाराबरोबर छान लागेल याबाबत शंका नाही. (सुकी चटणी असली तरी. आणि गरम भाकरी आणि लसणाच्या चटणीबरोबरच खायचे आहे, तर मग कधी लसणाच्या सुक्या चटणीत कच्चे तेल ओतून खाल्ले आहे काय?)

(अवांतरः तुलना करू इच्छीत नाही, पण 'बगारे बैंगन' हा या प्रकाराचा अतिशय दूरचा हैदराबादी नातलगही उच्च लागतो. 'भरली वांगी' आणि 'बगारे बैंगन' या दोन भिन्न संकल्पना असल्या तरी सांगावेसे वाटले.)