3. लोकसभेच्या म्हणजे राष्ट्रीय निवडणूकीस उभे राहणार्‍या पक्ष हा राष्ट्रीयच म्हणजे कमीत कमी तीन राज्यात तरी त्या पक्षाचे संपुर्ण जागा लढवणारा असावयास हवा, अशी अट असायला हवी.

तीन राज्य म्हणण्यापेक्षा एकुण संखेच्या किमान ७०% जागा लढवणे आवश्यक असावे, असं बंधन असावं, असं मला वाटतं. कारण आजकाल ३ छोट्या राज्यातील २५-५० जागा लढवून राष्ट्रीय पक्ष बनणारे असू शकतात.

"यापैकी नाही" यावर दिलेल्या दुव्यावर आधीच मतचाचणी चालू आहे, त्यामुळे हया मुद्द्याचा अंत्ऱ्भाव करावा, हि विनंती.

बाकी उत्तम.

मदत कशी हवी हे स्पष्टपणे लिहिलत तर उत्तम. कारण राष्ट्रपती जरी मराठी असले तरी त्यांचे सचिव असतीलच असं नाही. म्हणून पत्र मराठी आणि इंग्रजीत असावं असं मला वाटतं.

तुमच्या उपक्रमाला माझी काही मदत होवू शकत असल्यास मला आनंदच होईल.