आपले लिखाण दोनदा वाचल्यावर समजले.
माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की इंग्रजी भाषेतील गझला वाचून मजाच येत नाही. आता याचे कारण आपले मन तसे बनलेले आहे असे म्हणतीलही कुणी! पण, माझ्यामते एकेका काव्यप्रकाराची काही वैशिष्ट्ये असतात.
गझलेत प्रेम, त्यातील अधीरता, प्रेम जमणार की नाही याची काळजी, विरह, नंतर विरहाची सवय होणे व या प्रत्येक पातळीमध्ये कवितेचे / गझलेचे अस्तित्व, या गोष्टी घडण्यासारखी संस्कृती नको का असायला?
लिव्हिंग इन, वन नाईट स्टँड अशा गोष्टी जिथे पुर्वीपासूनच घडतात, तिथे कसला विरह, कसले प्रेम अन काय!
असे शेर तिथे होऊ शकतील म्हणा!
चुंबने ती आपली घुमतात कानी आजही
भेटतो मग मी कुणा ललनेस कंत्राटावरी
बंगला हा मालकीचा वाटला की काय गे?
की कधी येतेस अन जातेस कंत्राटावरी