संतोषराव, कथा भारी आहे.
अनुक्रमणिका, मुखपृष्ठ अशा ठिकाणी ठळकपणे होणारे उल्लेख मराठीत असावेत ह्या उदात्त हेतूने 'पावटेविज्ञान संस्था' असे शीर्षक मी अतिशय गंभीरपणे सुचवतो आहे. ह्या शीर्षकाबद्दल तुम्हाला (म्हणजे वाचकांना, सदस्यांना) काय वाटते?
ह्या कथेच्या अनुषंगाने एक जुनी शंका दूर करून घ्यावीशी वाटते आहे. मराठीत 'पाद्र्याला पावट्याचं निमित्त' अशी एक म्हण आहे. ह्या म्हणीचा ख्रिश्चन धर्मगुरूशी संबंध आहे काय? कृपया जाणकारांनी प्रकाश पाडावा.