वा! फारच चांगली माहिती दिलीत. ‘वृक्षमैत्र’ चा संपर्क क्रमांक किंवा पता दिलात तर आम्हाला आणि ज्यांना आवड असेल अशा इतर मनोगतींनाही पुढच्या कार्यक्रमाला जाता येईल. मुंबईत अशा संधी कमी मिळतात.
तुम्हाला कदाचित माहिती नसेल म्हणून सांगतो, संजय गांधी नॅशनल पार्कमध्येही तुम्ही जर दहा बारा (किंवा अधिक) जणांचा ग्रुप घेऊन जाणार असाल तर वनखात्यातर्फे एक शिक्षक उपलब्ध करून दिला जातो (अगदी रविवारी आणि सुटीच्या दिवशीही). हा शिक्षक पर्यावरण विषयातला चांगला तज्ञ असतो. तो तुम्हाला जंगलात कोअर एरियापर्यंत आत घेऊन जातो आणि पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्राणी, पक्षी, फुलपाखरं या विषयांवरची भरपूर शास्त्रीय माहिती उदाहरणांसहित देतो. शिवाय वनखात्याच्या तिथेच असलेल्या थिएटरमध्ये पर्यावरणावरच्या फिल्म्सही दाखवल्या जातात. एखाद्या रविवारचा सकाळचा पाच सहा तासांचा हा फार चांगला कार्यक्रम होऊ शकतो. फक्त या साठी तुम्हाला दोन चार दिवस आधी जाऊन पैसे भरून बुकींग वगैरे करायला लागतं. (आणि अशीच व्यवस्था धारावीच्या पक्षी अभयारण्यातही आहे.)
लहान मुलांबरोबरच मोठ्या लोकांसाठीही हे कार्यक्रम म्हणजे माहितीचं प्रचंड मोठं भांडार ठरू शकतात.