विजय,

स्त्री आणि पुरुष यांच्या स्वभावातील फरक हा नैसर्गिक आहे आणि हे आपण मान्य केलेलेच आहे.

माझ्या मते, सामान्यतः एखाद्या व्यक्तीची विचारसरणी (सकारात्मक, नकारात्मक, प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार करणारी किंवा खोलात न जाणारी/ईझी गोईंग) ही केवळ स्त्री/पुरुष असण्यावर अवलंबून नसून त्या व्यक्तीच्या सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर, लहानपणापासूनच्या संस्कारांवर अवलंबून असते. त्यामुळे नकारात्मक विचारांची शक्यता स्त्री-पुरुषांत सारखी असावी.

स्त्रियांच्या विचारसरणीमध्ये भावनिक प्रमाण तर पुरुषांच्या विचारसरणीत materialistic (मराठी?) प्रमाण जास्त असते हे जरी मान्य असले तरी स्त्रिया नकारात्मक विचार जास्त करतात हे पटत नाही/योग्य वाटत नाही.

माझ्या अनुभवातून, पुरुष "रिझल्ट ओरिएंटेड" असतो तर स्त्री "प्रोसिजर ओरिएंटेड" या विधानाशी सहमत आहे. (तरीही यातसुद्धा पार्श्वभूमीचा भाग असावाच!)

मला वाटतं की या "प्रोसिजर ओरिएंटेड" स्वभावामुळे स्त्रिया प्रत्येक कृतीवर टिका/भाष्य/सूचना अधिक करतात आणि "रिझल्ट ओरिएंटेड" स्वभावामुळे पुरुषांना ते विनाकारण/नकारात्मक वाटू शकते. आपल्याकडे बऱ्याच(सगळ्या नाही!) पुरुषांना वाटते की स्त्रिया जास्त कटकट करतात; पुन्हा "प्रोसिजर ओरिएंटेड" <-> "रिझल्ट ओरिएंटेड"!!!

असे असूनही, मी "प्रोसिजर ओरिएंटेड + रिझल्ट ओरिएंटेड" यांचे योग्य मिश्रण असलेले पुरुष आणि स्त्रिया पाहिलेले आहेत.

थोडक्यात काय, तर एखाद्या व्यक्तीचे विचार/भूमिका आपल्याला कसे वाटतात हे आधीच सांगितल्याप्रमाणे पार्श्वभूमीवर अवलंबून तसेच सापेक्ष असते.

----------------------------

अवांतर: तुम्ही Men Are from Mars, Women Are from Venus हे पुस्तक वाचलंय का? बऱ्याचशा लोकांना ते पटत नाही पण मला तरी त्यातलं स्त्री-पुरुष स्वभावाचं (विशेषतः स्वभावातील फरकांचं) विश्लेषण पटलंय. जमलं तर वाचून बघा.