मुद्दा क्र.१) कारण आजकाल ३ छोट्या राज्यातील २५-५० जागा लढवून राष्ट्रीय पक्ष बनणारे असू शकतात.

उत्तर. )  आसाम, आरीसा तसेच मेघालय, मणीपूर ह्या सारख्या ईशान्येकडील राज्यातील लोक व पर्यायाने तेथील नेते गण हिंदी पट्ट्या कडील नेत्यांइतके आक्रमक, धुर्त व कसलेले राजकारणी नाहीत. राष्ट्रीय स्तरावर हे ईशान्येकडील 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून ह्या देशात सत्तेवर येण्यापेक्षा त्या मंडळींना आपले अस्तित्व टिकवता व बहरता यावे ह्या साठी 'कमीत-कमी तीन राज्य' असे म्हटलेले आहे. तुम्ही त्या प्रदेशातील नेत्यांना याहून इतर राज्यात जावून आपला पक्ष बांधणं, वाढवणं जमेल का? त्यांची दिसण्याची, बोलण्याची रीत वेगळी आहे यामूळे ते त्याबाबतीत थोडे रिजर्वड आहेत व या गोष्टीचा त्यांना राष्ट्रस्तरावरील पक्ष उभा करणं काहीसे कठीण जाईल असे मला वाटते, म्हणून मी तसे म्हटले आहे.

मुद्दा क्र.२) "यापैकी नाही" यावर दिलेल्या दुव्यावर आधीच मतचाचणी चालू आहे, त्यामुळे हया मुद्द्याचा अंत्ऱ्भाव करावा, हि विनंती.
उत्तर. ) हा मुद्दा मी घेतला नाही कारण जर का वरील अनेक उपाय प्रत्यक्षात अंमलात आले तर उमेदवारांच्या योग्यतेचा स्तर ही नक्कीच वर जाईल. ''यापैकी नाही. " ह्या विचारात मला नकारात्मकता जाणवली म्हणून मी तो मुद्दा टाळत होतो. आपल्या मतांचा आदर आहेच. मी हा मुद्दयाचा नक्कीच अंतर्भाव करतो.

मुद्दा क्र.३) राष्ट्रपती हा कोणत्याही भाषेचा वा जाती-धर्माचा नाही/ नसतो हे मी मानतो. देशाची अधिकृत कामकाजाची भाषा इंग्रजी व हिंदी आहे. मी हे पत्र इंग्रजीतून एखाद्या वकिलाची मदत घेवून शब्दबद्ध करण्याच्या विचारात आहे.

प्रतिसादः तुम्ही ह्या चर्चेत सहभागी आहात हीच तर मला मदत आहे. अजून दुसरं काय हवं?