थोडक्यात पुरुष "रिझल्ट ओरिएंटेड" असतो तर स्त्री "प्रोसिजर ओरिएंटेड". त्यामुळे कदाचित लेडी बॉस च्या हाताखाली पुरुषाला काम करताना अधिक त्रास होत असावा.
हे अगदी पटलं! महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मला मिळालेल्या दोन नोकऱ्या लेडी बॉस मिळाल्यामूळेच सोडाव्या लागल्या. सोडाव्या लागल्या म्हणजे मलाच नोकरीवरून काढण्यात आले होते. दोन्ही वेळाला माझं कुठं चुकले? हे मला कळायला मात्र बराच वेळ लागला. लेडी बॉस आपलं बोलणं समोरचा व्यवस्थित ऐकतो आहे का? याकडेही लक्ष देतात. व त्यांनी जसे सांगितले तसेच काम झाले आहे की नाही हे त्यांच्या पद्धतीने उलट तपासणी करून पाहतात ही. काम झालं ह्याला ते महत्त्व देत नाहीत, त्यांच जसंच्या तसं ऐकून काम केलं नाही याचा त्यांना भारी राग येतो.