काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
बऱ्याच वर्षांपुर्वी अगदी नविन नविन पहिल्यांदाच गुजराथला गेलो होतो तेंव्हाची गोष्ट आहे. गुजराथी भाषा तेंव्हा मजेदार वाटायची . अर्धं कळायचं आणि ,अर्ध पुढचा माणुस काय बोलला असेल ह्याचा अंदाज लावायचा. त्यातल्या त्यात कच्छी कस्टमर असेल तर अजुनच पंचाइत व्हायची.
कच्छी गुजराथी फारच वेगळी असते. भुज, अंजार साइडला गेलं की पहिले तर अगदी वेगळंच वाटायचं. एखाद्या कस्टमर ला भेटायला म्हणुन तुम्ही गेलात तर मग तो हिंदी मधे पण काय बोलतो ते समजायला हिंदी टु हिंदी इंटर्प्रिटरची आवश्यकता भासायची. ह्या लोकांचं हिंदी पण अगदी गुजराथाळलेलं- आणि अगम्य ...
पुढे वाचा. : माझं बॅचलर लाइफ…(७)